कांद्याची चटणी

  • २ मोठे कांदे
  • १/२ वाटी ओले खोबरे,गोडलिंब
  • ३-४ लाल सुक्या मिरच्या,मीठ,थोडी साखर
  • फ़ोडणी साठी तेल,मोहरी,हींग,हळद
१५ मिनिटे
२-३ जणांना पुरेल

आधी कांदा,खोबरे,लाल मिरच्या वाटुन घ्या. कढई तापल्यावर त्यात तेल,मोहरी,हिंग,हळद,गोडलिंब घालुन फ़ोडनी करावी. त्यात वाटण घालावे. शिजल्यावर  मीठ,साखर घालावे.वरून कोथींबीर सजवावी.                                 

ही चटणी दोस्याबरोबर छान लागते.

मैत्रीण