मी!

मी वारकरी, मी मारेकरी.
मी कुरुक्षेत्री, मी क्रूसावरी. 

मी मैफलीत, मी दंगलीत
मी सुरात, मी सुऱ्यात!

मी जन्मदाता, मी नख लावतो
मी रडणारा, मी सरणावरी.

मी गुणितो, मी भागतो
मी अपूर्णांक, 'पूर्णांक' नाव लावतो !

जयन्ता५२