पावभाजी सँडविच

  • १-२ उकडलेले बटाटे
  • १ कांदा
  • १ टोमॅटो
  • ८ पावाच्या स्लाईस
  • पावभाजी मसाला
१५ मिनिटे
एकास एक/दोन वेळा

उकडलेले बटाटे सोलून बारीक कुस्करावेत. तव्यावर तेल आणि जिरा फोडणी करुन त्यात कांदा आणि टॉमेटो बारीक चिरुन मऊ होईपर्यंत परतावे. आता पावभाजीसाठी उकडलेला बटाट्याचा लगदा आणि पावभाजी मसाला(अथवा कोणताही आवडता मसाला) आणि मीठ टाकून थोडावेळ परतावे. मिश्रण प्रवाही नसावे. घट्टसर असावे.
पावावर या मिश्रणाचा थोडा जाड थर देऊन वर दुसरी स्लाईस लावावी. आणि तव्यावर तेल वा लोणी थोडे टाकून सोनेरी भाजावे. कडा 'सील' करण्यासाठी आपण पावांच्या आत भाजीचा जाड थर दिलेला असेल तो थोडा कडानी बाहेर आलेला असेलच.जपून आतले सारण पडू न देता दोन्ही पाव उभे करुन चारी कडा थोडावेळ परताव्या. बाहेर आलेली भाजी २ पावाना चिकटवण्याचे काम करेल.(तुम्ही दाबेलीवाल्याला तव्यावर कच्ची दाबेली परतताना पाहीले आहे का?तस्से!!)

'आदल्या दिवशीची पावभाजी' उरली असल्यास आणि 'आदल्या दिवशीचे खाण्यास' विरोध नसल्यास ती वापरली तरी चालेल.