चीज चिली टोस्ट

  • ब्रेड
  • चीज (वड्या)
  • आले
  • हिरवी मिरची
  • मिरपूड
  • पुदिन्याची पाने
१५ मिनिटे
एकास एक वेळ

ओव्हन २०० सें. तपमानावर ५ मिनिटे तापवून घ्यावा.

मग ब्रेड स्लाइस १८० सें. तपमानावर दोन्ही बाजुंवर प्रत्येकी ५-६ मिनिटे सोनेरी रंगावर भाजुन घ्याव्यात. (वरच्या व खालच्या दोन्ही कॉइल्स चालू ठेवाव्यात.)

मग ब्रेड स्लाइस वर बारिक खिसणीने  चिज खीसून पसरवावे. त्यावर आले खीसावे, मग मिरचीच्या अगदी पातळ चकत्या पसरवाव्यात, शेवटी मिरपूड भूरभूरावी. वर चार पाच पुदिन्याची पाने ठेवावित व पुन्हा थोडे चिज खीसून पसरवावे. आता मिश्रण असलेली बाजु वर ठेवून  २००-२१० सें. तपमानावर साधारण ५ मिनिटे ठेवाव्यात. यावेळी फ़क्त वरच्या कॉइल्सच चालू ठेवाव्यात.

ओव्हन उघड्ताच खाउ कि गिळु असे होते.