त्यांचा विश्वास झालो

प्रेरणा  मानस यांची सुंदर कविता "मी फुलांची रास झालो"
 
http://www.manogat.com/node/8609


मात्राप्रेमींनी चु.भू.द्या.घ्या.


मास्तरांना त्रास झालो
करून कॉपी पास झालो


लेपूनी मेकअप जरासा
यौवनाचा भास झालो


ठोसुनी ठर्रा इथे
पुरता मी ऱ्हास झालो


कावळ्यांना मेजवानी
पितरांचा मास झालो


प्रसिद्धीने मिळताच मी
त्यांचा दुःस्वास झालो


आरशाने ही फसावे
मी असा आभास झालो


संपताची गरज माझी
मी गळ्याला फास झालो


तू सुखी होतीस आधी
मी तुझा वनवास झालो


सभ्य लोकांनी टळावे
एव्हढा मी खास झालो


कापूनी माझा गळा मी
त्यांचा विश्वास झालो


   -अनिरुद्ध अभ्यंकर