उपवासाचे कबाब

  • १ वाटी भिजवलेला साबुदाणा
  • ३/४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • अर्धी वाटी उपवासाच्या भाजणीचे पीठ
  • अर्धी वाटी दही, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट
  • हिरव्या मिरच्या व आले बारीक वाटून
  • जीरे, मीठ, साखर व तुप चवीनुसार
३० मिनिटे
२ जणांसाठी
  • उकडलेले बटाटे किसून किंवा स्मॅशरने बारीक करून घ्यावेत.
  • भिजवलेला साबुदाणा, जिरे, मीठ व साखर त्यात एकजीव करून घ्यावे.
  • मिश्रणात दही व दाण्याचा कूट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या/आले चांगले मिसळून घ्यावे.
  • सर्वांत शेवटी उपवासाची भाजणी त्यात एकत्र करून हाताने वळून सळी भोवती लांबट गोल (कबाबासारखे) लावून घ्यावे.
  • ह्या मिश्रणावर तुपाचा हात फिरवून सळी गॅस वर मंद आचेवर फिरवत राहणे. (बर्नरवर ठेवू नये)
  • सर्व बाजूंनी लाल खरपूस भाजले गेल्यावर परत तुपाचा हात फिरवावा.
  • चांगले भाजले गेल्यास हाताने अलगद सळीपासून दूर करता येतात.
  • वाढताना उपवासाच्या  चटणी बरोबर किंवा भाजलेल्या मिरच्यांबरोबर वाढावे.

उपवासाच्या दिवशी उपवासाचे कबाब खातांना त्यांना कबाब म्हणू नयेत

मोठी बहीण