तळीराम(कबीर )

प्रेरणा: वैभव जोशी यांची अप्रतिम कविता "कबीर"
http://www.manogat.com/node/8647 ,
कारकुनांचा "(कबीर)", सातीचा "(फकीर)"


मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


भरायला ग्लास मला जरासा उशीर झाला
लटपटले हातपाय आणि देह बधिर झाला


कुणी म्हणाले कधीच ना बंद तो मैखाना होतो
लगेच खात्री करून घेण्या बेवडा ही अधीर झाला


मला समजले बघून तुझ्या डोळ्यात साकी
कालचा सावकार कसा आज फकीर झाला


सुरू झाली देवपूजा त्यांची करून सर्व भागल्यावर
आता उमगले तळीरामाचा का आज कबीर झाला


नाव बदलून मनोगती मी विडंबने बरीच केली
खरे नाव सांगण्यास माझा कधीच ना धीर झाला


              - (निर्व्यसनी) अनिरुद्ध अभ्यंकर