मार्स झालो

रस्तोरस्ती कार्स झालो
अपघातांचा सोर्स झालो


पाण्याने रे भरून ठेवा
मी काचेचे जार्स झालो


एकपात्री नाटकाचा
बहुपात्री फार्स झालो


हातभट्टी काय म्हणता?
मी विदेशी बार्स झालो


चला जेवण्यास बसा
पहिला-दुसरा कोर्स झालो


लाजलाजुनि चूर झालो
सूर्यमाली मार्स झालो


रडक्या बाळा रिझवाया
ट्विंकलणारे स्टार्स झालो


वायुदळी नि पायदळी
मी आर्म्ड फोर्स झालो


विएतनामी, इराकमध्ये
अमेरिकेची वॉर्स झालो


(पडद्याने त्या अंग झाका
मी रुपेरी स्टार्स झालो


चोरचिलटे मागे लपता
तुरुंगातले बार्स झालो)


आमची प्रेरणा: मानसरावांच्या फुलांची रास  व खोडसाळरावांच्या धोतराची कास. नेहमीप्रमाणे सुधारणांचे स्वागत.