माणसांना येते हुशारी!

माणसांना येते हुशारी!
उंटावरी त्यांची सवारी

वेलांट्या आहेत 'विचारी'!
(त्यांना लागे जरा हुशारी)

डाव हारलो तरी खेळतो
आहे मीही तसा जुगारी

ताठ आमुची सदैव कॉलर;
असो पगारी, असो उधारी

भिरभिरते एसीतुन कविता
बिलंदरी इंटरनेटची भारी!

हा आयोजक अन् तो गवई
हा अडत्या अन् तो व्यापारी

धडपडते ही फुटा फुटावर 
पाहुन रांगा कशी बिचारी!

अपव्यय वेळाचा करतो मी
शब्दांचा मी आहे भिकारी
- कारकून


माझी प्रेरणा- चित्त ह्यांची गझल कोलांट्या घेतात मदारी