आजकाल मी जरा झोपेमध्ये बरळतो

प्रेरणा प्रसाद यांनची सुरेख गझल आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!
मात्रा प्रेमींनी चु.भू.द्या.घ्या.


लाज वाटते मला तुला म्हणून सांगतो
आजकाल मी जरा झोपेमध्ये बरळतो

रंग चेहऱ्यास रोज फासतो नवे नवे
पाहूनी मज समोर आरसा ही हासतो

रोज खेळतो मी रमी, तीन पत्ती कधी
जाणतो जुगार हा, तरी खुशाल खेळतो 

रोज ढोसतो मी रम, व्हिस्की कधी तरीच
दुःख विसरण्यास मी इथे नशेत झिंगतो

माझिया घरी मग न काही वेगळे घडे
बायको गर्जतेच मी चुपचाप ऐकतो

मानले वृत्तांत मी न इथे लिहितो कधी
शब्द मज हवे तसे विडंबनी मांडतो

 -अनिरुद्ध अभ्यंकर