तक्रार बायकोची गझलेत मांडली मी

तक्रार बायकोची गझलेत मांडली मी
संसारलक्तरं ही वेशीस टांगली मी

सांप्रत खुशाल घाली सासू खुज्या तुमानी
पाहून दृश्य असले मम जीभ चावली मी

होती न  औषधाला मम बायकोत गोडी
मधुमेह जाहल्याने ही पथ्य पाळली मी 

आजार हा असा की मज वर्ज्य गोड गोष्टी
समजून पथ्यकारी तोंडास लावली मी

आता कलेवरागत जगतो तिच्यासवे मी
आधी अनेक वर्षं ही ब्याद टाळली मी

देताच साद मजला त्या 'खोडसाळ' नजरा
भिडवून डोळियांना लाईन जोडली मी


आमची प्रेरणा - अनिरुद्ध ह्यांची गझल तक्रार वेदनांची गझलेत मांडली मी