खडे मसालेके आलु

  • कोवळे बटाटे
  • मिरे, धने, सुकी लाल मिरची, तमाल पत्र, बडीशेप, हळद, अनारदाणा
  • फोडणीचे साहित्य
६ तास
५-६ जणांना

एका मध्यम आकाराच्या पातेल्यात ३-४ वाट्या पाणी घेऊन त्यात आख्खे १०-१२ मिरे  आणि ५-६ भरडलेले मिरे, दोन मोठे चमचे धने थोडे भरडून, १ चमचा बडीशेप, तमाल पत्र, ५ लाल मिरच्या प्रत्येकाचे दोन तुकडे करून, आणि हळद टाका.  रंग आवडत असेल तर इथे मिळणाऱ्या पाप्रिका म्हणाजे लालचुटुक पण अजिबात तिखट नसलेल्या मिरचीची पूड घाला.  तिखटपणा तुम्हास हवा असेल त्या प्रमाणत मिरे आणि लाल सुक्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करा.  असा हा मसाला कमीत कमी ३ तास भिजू द्या.

इथे बेबी पोटॅटो म्हणजे साधारण एक दीड इंच व्यासाचे बटाटे मिळतात ते २ पौंड घ्यावे.  किंवा डब्यात असलेले बटाटे ३ डब्याचे घ्यावे.  तसले नसतील तर नेहमीचे बटाटे घेऊन त्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात साधारण १-१.५ इंच आकाराच्या.

मला स्वतःला बटाट्याची साले ठेवलेली आवडतात.  परंतु या भाजीसाठी बटाट्याची साले काढण्याची पद्धत आहे.  अर्थात डब्यातल्या बटाट्यांची साले काढलेलीच असतात.

नंतर एका कढईमध्ये दोन डाव तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग, आणि हळाद घालून फोडणी करा.  फोडणीमध्ये बटाटे घालून ते खरपूस परता.  त्यांत मसाला भिजवलेले पाणी घालून ते सर्व बटाटे पूर्ण शिजेपर्यंत शिजवावे.  लागल्यास आणखी पाणी घालावे.  भाजीमध्ये मीठ आणि चालत असल्यास चवीला साखर/गूळ घालावे.

श्री. पेठकरसाहेबांच्या पद्धतीने त्यावर चरलेली कोथिंबीर पसरून वाटी किंवा वाडग्यात जेवणात वाढावे. 

कशी वाटली ही कृति?  आपले अभिप्राय जरूर कळवा.

कलोअ,
सुभाष

पानात या बरोबर कापलेला कांदा-कोथिंबीर, लिंबू किंवा दही घालून बरोबर द्यावा.  हा रस्सा भाकरीबरोबर छान लागतो.  इथे मिळणारा पिटा ब्रेड किंवा सिरियन पॉकेट ब्रेड सुद्धा चांगलाच लागतो.

हैद्राबादी पदार्थ आमचे स्नेही नानासाहेब आणि जयावहिनींकडून