रोज भांडी घासण्याची

प्रेरणा: स्नेहदर्शन यांची सुरेख गझल  रोज काटे वेचण्याची


रोज भांडी घासण्याची सवय झाली
झाडूपोछा मारण्याची सवय झाली


 मी हिला समजाविले पण व्यर्थ गेले
 आराम तिला करण्याची सवय झाली


एकदा शिजवले होते तिने पण
आता मला खानावळीची सवय झाली


लाख सांगितले खोटे लोकांस येथे
पण मला ह्या जिण्याची सवय झाली


मी कधी ना पाहिली हो जीत माझी
नेहमी मज हरण्याची सवय झाली


विसरलो मी लिहिणे सरळ साधे
मनोगती ह्या विडंबनाची सवय झाली


-(सवयखोर) अनिरुद्ध अभ्यंकर.