स्वप्न तू की खरी हकिकत


स्वप्न तू की खरी हकिकत


स्वप्न तू की खरी हकिकत, कोण तू सांगून टाक |
किती वेळची दूर उभी ग, ये जवळ आणखीन ना || धृ ||



जणू पहाटेवरी, गर्व संध्येचा हो |
केसांतच एक चेहरा, व्यक्त हो, धुसर हो || १ ||


स्पंदनांनी पहा, परिसले पदरवा |
हृदयावर पदराची, सरकली सावली || २ ||



भेटतेसच मला, जीवनी हर घडी |
निघुनी जासी, सोडूनी, कहाण्या कितीएक || ३ ||


पुन्हा बोलाव मला, अन् माझे नाव घे |
अडखळतो मी पुन्हा, हातांनी धर मला || ४ ||



ख्वाब हो तुम या कोई हकिकत या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.


मूळ हिंदी गीत: मजरूह, संगीत: सचिनदेव बर्मन, गायक: किशोरकुमार
चित्रपट: तीन देवियाँ, भूमिका: देव आनंद, कल्पना, नंदा, सिमी



मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२०३