कॉन्फेस्ट - ध्यान

कॉन्फेस्ट


ध्यान


 


आणि मग तंबू मध्ये जाउन जरा पडलो. पोटात पडले होतेच.
पण पाठीला काही तरी टोचतच राहीले. मग शेवटी उठलो आणि बाहेर आलो.


सूर्य हळूहळू अस्ता कडे चालला होता.उन्हं अगदी तिरपी होऊन त्यात झाडांची हिरवी पानं पोपटी दिसत होती.
नदी चं पाणी संथ दिसत होतं.ठिकठीकाणी कँप फायर च्या शेकोट्या पेटल्या होत्या. काही लोक गप्पा मारत गोल करुन बसले होते.


सायंकाळ सगळ्यां साठी म्हणून फ़्राइड राईस केला. आणि शेकोटी जवळ जाउन बसलो.
एक ग्रुप छान पैकी अध्यात्म - जन्म - मरण आणि आपण असे डिसकस करत बसला होता. त्यात हिंदू फिलोसॊफी ची चर्चा चालली होती.
पुनर्जन्म आणि आणि त्याचे दाखले कसे आहेत हे एक माणूस समजावून सांगत होता.
त्याचा मतितार्थ होता की, हिंदू फिलोसॊफी गहन आहे.
आणि आयुष्य समजून घेण्यासाठी, स्वत:कडे पहिलं पाहीजे.
स्वत: चा आतला आवाज ऐकला पहिजे.  आणि त्या साठी 'ध्यान' या शिवाय काहीही उपोयोगी येत नाही.  आणि पण असं खुप काही.



सगळे ऐकत होते, काही जणांनी शंका विचारण्या साठी हात पण वर करुन ठेवले होते.
तो पुढे सांगत होता,
ध्यान करण्यासाठी कहीही घ्या, जसे ड्रम्स,
गेट इनटु द रिधम, यु विल लिसन टु युवर्सेल्फ!
बट यु हेव टु गिव्ह टाइम. फ़्री युअर्सेल्फ.
अल्सो यु नीड टु गेट रिड ओफ इंप्युरिटीज, थिंक अगेन!!
सो लाइफ इज लाइक अ क्लोथ यु चेंज इट बट सोल रिमेन्स.
त्या माणसाचे साध्या भाषेतले इतकं रसाळ निरुपण ऐकुन मी पण चकितच झालो!
बराच वेळ ऐकतच बसलो. रात्रं चांगलीच झाली आहे असं वाटायला लागलं तसं उठलो. ड्रम्स चे लयबध्द आवाज येत होते. त्या आवाजा कडे अंधारात चालायला लागलो.
---
आवाज मोठा होत गेला.


ड्रम्स च्या आवाजात काही बोलणेही शक्य नव्हते,
खुप जण आपापले ड्रम्स घेउन आले होते. सगळेच वाजवणारे!


एक मस्त ताल तयार झाला होता. तालावर आपोआप सगळ्यांच्या बरोबर माझेही पाय हलायला लागले. मजा वाटायला लागली. सामुहीक, नैसर्गिक न्रुत्य!



थोड्यावेळाने मग टॊम पण दिसला, त्याने हात केला तसे जरा दूर वर जाउन गप्पा मरत बसलो. त्याने सांगितले की तो इथे बर्याच काळापासून येतो आहे. आणि इथलं वातावरण हे असं च आहे. मुक्तं आणि मनमोकळं! या सगळ्यासाठेच तो येतो.


खूप वेळ ध्यान, जन्म, काळ, जगणे; असे काही-बाही बोलत बसलो.
तो म्हणाला इथे सकाळी ध्यान करायला खूप मजा येते. आपण सकाळी नदीवर जाउ या.
बर्याच वेळाने परत आलो आणि झोपलो. पण पाठीला काही तरी टोचतच राहीले!



सकाळी नदी वर नि:शब्द पणे
 चालत चालत गेलो. अजून पहाट होत होती.
ड्रम्स कधी तरी रात्री थांबले होते.
सगळी कडे एक शांतता पसरली होती...
धुक्यात गुरफटलेली एक गहीरी पहाट! वाळूवर ध्यानाला बसलो, मन शांत होत गेले.
अगदी वेगळाच ध्यानाचा अनुभव त्या दिवशी आला.
निसर्गा बरोबर ची एक वेगळीच एकरुपता.
आणि हलकेच अलवारपणे डोळ्यावर ऊन आलं. खूप काळ गेला आहे असं वाटून गेलं. जणू काही त्या अनाम नदी किनार्याचे झाड होउन त्या वाळूत रुजलोच होतो.


मागे कुणाचे तरी पाय वाजले असे
वाटले म्हणून पहीले तर खूप लोक नि:शब्द पणे येउन शांत पणे ध्यान मग्न बसलेले!


एक सामुहीक ध्यान!