मी, एक सामान्य माणूस!

सकाळच्या रविवार पुरवणीतील एक लेख खाली देत आहे. 

लेख योगेश्‍वर गंधे यांनी लिहीला आहे. कित्येक लोकांना हे म्हणायंच असतं पण जमत नाही. खुप छान शब्दांत त्यांनी ही व्यथा मांडली आहे.

===================================

मी, एक सामान्य माणूस! गावकुसाबाहेरचा... पण आत्मप्रेरणेने जागवली प्रज्ञा, माझं शील समाजासाठी जपलं आणि अनंत यातना सहन करूनही सर्वांप्रती मनात ठेवली कायम करुणा.
..... माझ्या जन्मापूर्वी- जन्मानंतर आणि मृत्यूनंतरही विटंबना, अवहेलना, मानहानी सुरूच आहे... माझ्याच भाईबंदांकडून. मनात खूप उद्रेक होतो हे सारं पाहून!... कारण आता माझं कुणी ऐकणारच नाही... खरंय. कोण आहे माझ्यामागे?

हे जहाल होते तरी लोकमान्यांच्या मागे सहिष्णुतेने समाज पुढे नेणारे बुद्धिवादी आहेत... देहाने संपले असले तरी गांधींच्या मागे "गांधीगिरी' करणारा आजचा तरुण देश आहे, पुरोगामित्वाची झूल मिरवत सत्तेचं शहाणपण करणारे काही टक्के का असेना लोक फुले- शाहूंच्या मागे आहेत... ज्यांचे विचार आणि कृती पूर्वी किंवा आताही हिंदुत्ववाद्यांना पचले (किंबहुना पटले) नाहीत, त्या स्वातंत्र्यवीरांच्या मागे टिकण्याची धडपड करणारे परिवार आहेत. पण... माझ्यामागे कोण आहेत?

माझ्यामागे कुणी असते, तर माझ्या नावाने असे दंगेधोपे झाले नसते, खैरलांजीचे थैमान घडले नसते; मी केवळ दहा वर्षांचे आरक्षण नोंदले होते, ते पुढे पन्नास वर्षे वाढले नसते. जगात निळा रंग स्वातंत्र्याचा रंग आहे; पण माझ्या नावाने जेव्हा निळ्याचा स्वैराचार होतो आणि मनाला मेल्यानंतरही मरणयातना भोगाव्या लागतात, तेव्हा खरंच मला हा प्रश्‍न सतावतो... माझ्या मागे कोण आहे?

मी- एक सामान्य मानव; पण तुम्हीच मला "महामानव' बनवलं आणि माझ्या आचारविचारांचा जराही विचार न करता ठिकठिकाणी मला उभं केलंत. पन्नास वर्षांपूर्वी प्रज्ञा- शील- करुणेने ओथंबून मी धम्माला शरण गेले तेव्हा बौद्ध हसला... आज ठिकठिकाणी मी उभ्या उभ्याच जे काही चाललंय ते फक्त पाहत गोठून गेलोय. माझ्यातली प्रज्ञा थिजून गेलीय, आता शीलाचा प्रश्‍नच येतो कुठे? निरपराध्यांस मारण्यात अन्‌ समतेच्या शांतीत आग धुमसवण्यात करुणा हरवलीय!

म्हणून म्हणतो माझ्यामागे कुणीच नाही....

आता नाही पाहवत आणि सोसवत. जे चाललंय ते काही बरं नाही. मागत नाही काही- पण आजच्या दिवशी एकच सांगतो, की बांधवांनो, मी महामानव नाही- आहे एक सामान्य तुमच्यासारखा, तुमच्यातलाच एक. "भवतु सब्ब मंगलम्‌'वर श्रद्धा असणारा. पण... माझ्यावरची तुमची अंधश्रद्धा मलाच दाहक ठरू पाहतेय. पुन्हा मला मारू नका. तुम्हाला घेऊन मी धम्माला शरण गेलो... पण आज "हे' सारं पाहताना मी तुम्हाला शरण जातोय का, या प्रश्‍नाने बुद्ध परत हसतोय. मी मात्र दिवसेंदिवस होतोय गच्छामी!...

थोडी तरी प्रज्ञा जागृत ठेवा, समाजातील सर्व जाती-धर्माचे शील शाबूत राहू द्या- आणि हो, परत मरणयातना देताना करुणेचा विचार मनात येऊ द्या, माझ्यामागे कुणी नाही म्हणून!

माझ्या नावाने नाही, स्वकर्तृत्वावर इतिहास घडवा. बस्स. आजच्या दिवशी एक मानव म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून एवढीच विनंती!मी, एक सामान्य माणूस! गावकुसाबाहेरचा... पण आत्मप्रेरणेने जागवली प्रज्ञा, माझं शील समाजासाठी जपलं आणि अनंत यातना सहन करूनही सर्वांप्रती मनात ठेवली कायम करुणा.
..... माझ्या जन्मापूर्वी- जन्मानंतर आणि मृत्यूनंतरही विटंबना, अवहेलना, मानहानी सुरूच आहे... माझ्याच भाईबंदांकडून. मनात खूप उद्रेक होतो हे सारं पाहून!... कारण आता माझं कुणी ऐकणारच नाही... खरंय. कोण आहे माझ्यामागे?

हे जहाल होते तरी लोकमान्यांच्या मागे सहिष्णुतेने समाज पुढे नेणारे बुद्धिवादी आहेत... देहाने संपले असले तरी गांधींच्या मागे "गांधीगिरी' करणारा आजचा तरुण देश आहे, पुरोगामित्वाची झूल मिरवत सत्तेचं शहाणपण करणारे काही टक्के का असेना लोक फुले- शाहूंच्या मागे आहेत... ज्यांचे विचार आणि कृती पूर्वी किंवा आताही हिंदुत्ववाद्यांना पचले (किंबहुना पटले) नाहीत, त्या स्वातंत्र्यवीरांच्या मागे टिकण्याची धडपड करणारे परिवार आहेत. पण... माझ्यामागे कोण आहेत?

माझ्यामागे कुणी असते, तर माझ्या नावाने असे दंगेधोपे झाले नसते, खैरलांजीचे थैमान घडले नसते; मी केवळ दहा वर्षांचे आरक्षण नोंदले होते, ते पुढे पन्नास वर्षे वाढले नसते. जगात निळा रंग स्वातंत्र्याचा रंग आहे; पण माझ्या नावाने जेव्हा निळ्याचा स्वैराचार होतो आणि मनाला मेल्यानंतरही मरणयातना भोगाव्या लागतात, तेव्हा खरंच मला हा प्रश्‍न सतावतो... माझ्या मागे कोण आहे?

मी- एक सामान्य मानव; पण तुम्हीच मला "महामानव' बनवलं आणि माझ्या आचारविचारांचा जराही विचार न करता ठिकठिकाणी मला उभं केलंत. पन्नास वर्षांपूर्वी प्रज्ञा- शील- करुणेने ओथंबून मी धम्माला शरण गेले तेव्हा बौद्ध हसला... आज ठिकठिकाणी मी उभ्या उभ्याच जे काही चाललंय ते फक्त पाहत गोठून गेलोय. माझ्यातली प्रज्ञा थिजून गेलीय, आता शीलाचा प्रश्‍नच येतो कुठे? निरपराध्यांस मारण्यात अन्‌ समतेच्या शांतीत आग धुमसवण्यात करुणा हरवलीय!

म्हणून म्हणतो माझ्यामागे कुणीच नाही....

आता नाही पाहवत आणि सोसवत. जे चाललंय ते काही बरं नाही. मागत नाही काही- पण आजच्या दिवशी एकच सांगतो, की बांधवांनो, मी महामानव नाही- आहे एक सामान्य तुमच्यासारखा, तुमच्यातलाच एक. "भवतु सब्ब मंगलम्‌'वर श्रद्धा असणारा. पण... माझ्यावरची तुमची अंधश्रद्धा मलाच दाहक ठरू पाहतेय. पुन्हा मला मारू नका. तुम्हाला घेऊन मी धम्माला शरण गेलो... पण आज "हे' सारं पाहताना मी तुम्हाला शरण जातोय का, या प्रश्‍नाने बुद्ध परत हसतोय. मी मात्र दिवसेंदिवस होतोय गच्छामी!...

थोडी तरी प्रज्ञा जागृत ठेवा, समाजातील सर्व जाती-धर्माचे शील शाबूत राहू द्या- आणि हो, परत मरणयातना देताना करुणेचा विचार मनात येऊ द्या, माझ्यामागे कुणी नाही म्हणून!

माझ्या नावाने नाही, स्वकर्तृत्वावर इतिहास घडवा. बस्स. आजच्या दिवशी एक मानव म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून एवढीच विनंती!