------- सत्य-----

घराच्या आत मी पाऊल टाकलेय,


अंधाराचा उंबरठा दरवाजे तोडून


उदयास्ताच्या क्षितीजावर पसरलाय...


मी उन्मत्त नजरेत सूर्याच्या गर्भातले


सत्य शोधून आणलेय,


आणि तरीही तुझे आध्यात्मिक डोळे


जहाल कटाक्ष फेकतायत


माझ्या कोरड्या नास्तीकपणावर!!


--------------मयूर लंकेश्वर