भेटली भीक तर हवी आहे

आमची प्रेरणा चित्त यांची सुरेख कविता भेटली दाद तर हवी आहे


भेटली भीक तर हवी आहे
शेवटी मी अरे कवी आहे


घे मजला सांभाळून थोडे
प्रीत माझी नवीनवी आहे


सावळे, सावळी तुझी काया
बोजड आणि आडवी आहे


गुदमरणार मिठीत तीच्या मी
हे आलिंगन पाशवी आहे


टाळतो पाहताच तीला मी
मागते ती अवाजवी आहे


भ्यायला चेहऱ्यास चांदोबा
काय ती एवढी नटवी आहे?


सत्य मलाच उशीरा कळाले
काय पण तिची थोरवी आहे !


समजू नकाच लाथाळी हिला
प्रेम आमचे गाढवी आहे


"चित्त" च्या ह्या सुंदर कवितेला
"केशवसुमार" वाळवी आहे.


 -केशवसुमार