वाटे बहूत लज्जा बोलायला मला

आमची प्रेरणा चित्तरंजन यांची गझल आहे बरेच काही सांगायला मला


वाटे  बहूत लज्जा बोलायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला


बसतो कधी असा मी, बसतो कधी तसा
कोठे तयार तूही समजायला मला


भेटायला नको ते का भेटती अत्ता?
झाले नको नकोसे भेटायला मला


माझी बिकट अवस्था लपवून ठेवली
झाले कठीण होते रेटायला मला


हलकेच(?) थाप तूही पाठीत घातली
होतेच त्राण कोठे सोसायला मला


दाबून ठेवलेली मी खूप वेळची
झाला उशीर आहे सांगायला मला


लिहिले असे कसे तू सांभाळ "केशवा"
येतील लोक आता मारायला मला


 केशवसुमार