लिखाण -२

आमची प्रेरणा कुमार जावडेकर यांचे लिखाण


रोज तुमचे नवे लिखाण हवे
आणि अमचे सुरू गिराण हवे


फक्त सोज्वळ शब्द नको हो
दोन अर्थी जरा उधाण हवे


कोडगे वाचण्या लिखाण परी
लोक सारे इथे अजाण हवे


येवढी घाण हा कसा करतो?
(रोज ह्याला नवे ठिकाण हवे!)


"केशवा"रे पुरे लिखाण तुझे
घाण हे वाचण्यास त्राण हवे !!


- (कोडगा) केशवसुमार.