नूतन वर्षाभिनंदन !

धुके पांघरून कुंद... कोण उभे गं तेथे
हा दिसतो निसर्ग रौद्र... नकोच त्याशी नाते !
तू हळूच उमलून ये ना... होऊन केशरकाया
बघ साद घालते तुजला... ही नववर्षाची माया !
घे टिपून अवघा कण... कण... तू फेक जुना पेहराव
हा हसून उभा सामोरी... नवस्वप्नांचा गाव !