तू दिलेले दु:ख येथे साठले
दु:खातही ताजेतवाने वाटले !
खंडहरे झली मनाच्या भावनांची
पण मला ते आशियाने वाटले !
हासण्याचा काढला माझ्या जनाना-
आसवांनी,ते तराणे वाटले !
राहिली ही लक्तरे हातात माझ्या,
ते अभंगाचे बहाणे वाटले !
अमृताचे वीष हे भिनले शरीरी
रोजचा मृत्यूच गाणे वाटले !!