काय कू

आमची प्रेरणा अनील बोकील यांच्या हायकू


साजरे केले सण
वाढलेले तन
आता पुन्हा 'जिमे'त वेट पाहणे आले
***


धुलवडीचे भांग
मी पिण्यात दंग
पाय कधी घसरला कळलच नाही
***


हिरवे जर्दा पान
चंपाबाईची तान
माझा बाप अचानक माझ्या समोर
***


चिंचा, बोरे, आवळे?
हलकट,मेले,टवळे
नक्की कुठे, केव्हा शेण खाल्ले?
***


म्हातारपणी चळ
मरायला टेकलेले
पण 'त्यांच्या' मागे धावणे सुरूच..;
***


वाचक दिसेना
प्रतिसाद मिळेना
तरी 'केशवा"चे लिहिणे सुरुच...
***
केशवसुमार.