पाहिला मी

मित्रहो, हे. इथले माझे पहिले लेखन आहे


चू. भू. द्या. घ्या.


 


नाथास आज पुन्हा कोड्यात पाहिला मी


"का आव ज्ञानबाचा रेड्यात पाहिला मी??"


 


पाण्यावरी मुक्याने वाहून चालला जो


तो प्राण नाविकाचा होड्यात पाहिला मी


 


कोषात पाखराला सोडून आज आला


त्यालाच पाठमोरा वेड्यात पाहिला मी


 


होतो इथे जरासा आवाज पावलांचा


तो पाय प्रेषिताचा बेड्यात पाहिला मी


 


आलाच मानण्याला आभार सावळ्याचे


वीटेवरी तयाला जोड्यात पाहिला मी