शेन वॉर्न: "मावळत्या स्पिनकरा"

मावळत्या स्पिनकरा !
अर्घ्य तुज जोडूनी दोन्ही करा!

जो जो बॅट लावी 'फिरकत्या'
तो तो पाठ फिरवी, चालता
रीघ तंबूकडे ही तू लाविली
'सप्त-शतक-बळीवरा' ,
मावळत्या स्पिनकरा ॥१॥

तेंडुलकरची तुला 'आठवण'
पीटे तो जरी,स्नेह तरी पण
जगात भरले तुझे भक्तगण
'फिरकीवीर तू खरा'
मावळत्या स्पिनकरा ॥२॥

उत्तेजक परि तू केलेस सेवन
किती जणींना केले 'एसेमेस'
(कामजिवनी तू पारंगत)
नर्स,गृहिणी अन् पत्नीपण..
'समदर्शी' तू खरा!
मावळत्या स्पिनकरा ॥३॥

(जयन्ता५२)