रवा खीर

  • रवा ४ चमचे
  • साखर ४ चमचे
  • दूध १ कप
  • साजुक तूप १-२ चमचे
१५ मिनिटे
२ जण

एका छोट्या कढईत साजूक तूप व रवा घालून मध्यम आचेवर लालसर रंगावर भाजून घेणे. त्याचवेळी एकीकडे एका पातेल्यात दूधात साखर घालून गरम करायला ठेवणे. रवा छान भाजून झाला की तो दूधात घालून सतत ढवळणे. दूध उकळून वर यायला लागले की गॅस बंद करणे. ह्या १ कप दुधाची एक मोठा बाऊल भरून दाट खीर तयार होईल.

खीर तयार  झाल्यावर थोड्या थोड्या वेळाने ढवळणे, म्हणजे साय धरणार नाही. एकसंध दाट खीर चांगली लागते. दूध/साखर आवडीनुसार कमीजास्त घालणे.

ही खीर गार/गरम चांगली लागते. पौष्टीक आहे.

स्वानुभव