पाटवड्या

  • २ वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ
  • १/२ वाटी तेल
  • धने-जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
  • मीठ
  • २ च. लाल तिखट
  • हळद
  • हिंग
  • कोथिंबीर
  • ओले अगर सुके खोबरे
  • २ वाट्या पाणी, फोडणीचे साहित्य
१५ मिनिटे
४ जणांसाठी

जरा जास्त तेल घालून फोडणी करावी. नंतर चण्याच्या पिठात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणे-जिरे पावडर व पाणी घालून एकत्र करावे. घट्ट पिठले होईल, इतपतच पाणी घालवे व ते पीठ फोडणीत ओतावे. पीठ २-३ वाफा आणून पूर्ण  शिजवून घ्यावे. नंतर ताटाला तेलाचा हात लावून ते पिठाले ओतावे व थापून त्यावर कोथिंबीर व खोबरे घालून वड्या पाडाव्यात.

१. जर चण्याचे पीठ प्रथम फोडणीतच भाजून घेतल्यास या वड्या जास्त खमंग लागतात.

२. साधारणपणे १ वाटी पीठाला १ वाटी पाणी लागते.बाकीचे साहित्य चवीप्रमाणे.

स्वतः