दुधीची दुधातली भाजी

  • अर्धा किलो दुधी, २ चमचे साजुक तुप, जिरे, हिंग, हिरवी मिरची
  • चवीप्रमाणे, १ वाटी दुध, १ चमचा तांदळाची पिठी, १०-१२ काजुचे तुकडे
  • मीठ चवीनुसार व सजावटीकरिता कोथिंबीर
३० मिनिटे
४ जणांकरिता

सर्वप्रथम दुधी चिरून घ्यावा. गॅसवर छोटा कुकर गरम करायला ठेवावा. गरम झाल्यावर त्यात तुप, जिरे, हिंग व मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून त्यात दुधी,  दुधात पिठी कालवून व काजुचे तुकडे घालावे. कुकरला झाकण लावून १ शिट्टी काढावी. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून त्यात मीठ घालून भाजी हलवून घ्यावी. एका भांड्यात काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

ह्या भाजीत हळद घालत नाही. गरम फुलक्यांबरोबर चांगली लागते. मला नुसती पण खायला आवडते.

मुळ पाककृती शांता गोखले ह्यांची आहे. माझी बहिण वंदना कडून मी शिकले.