(ऋतू येत होते ऋतू ज़ात होते -३)

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल  ऋतू येत होते ऋतू ज़ात होते - ३
ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
फसवणे तुझ्या हे स्वभावात होते

नको ते मला आज मागून गेली
तिचे मागणे फार वाह्यात होते

गिरवता तिचे नाव मी राजबिंडे
तिने मारलेले श्रिमुखात होते

तिच्या रुमच्या कवडशा मधोनी
तिला पाहिले बाहुपाशात होते

जरी लाजते आज तुमच्या समोरी
(परी गुदगुली 'आतल्याआत' होते)

पुन्हा दैव आलेच अडवे मला बघ
तिच्या सोबतीला तिचे तात होते

नको " केशवा" जाउ वाटेस माझ्या
मला 'चक्रपाणि' बजावीत होते

तुझी वाचुनी रोज सूमार काव्ये
तुला "केशवा" टेकले हात होते

केशवसुमार