(भिक्षा)

आमची प्रेरणा केसुभाईंची.. सॉरी अनिरुद्धरावांची कविता शिक्षा

मी तुझ्याकडे घेऊन
आलो होतो झोळी
माझ्यावर तू खूप
अन्याय करते आहेस
तुझ्या दाराशी
तुझ्या दानतीवर
तुझाच भिकारी
तुला विनंती करतोय
फक्त एकदा बघ
माझ्या पोटाकडे
आणि मग दे
तुझं अंतिम माप
तू देशील ती भिक्षा
मला प्राक्तना प्रमाणे
मान्य आहे..

--अदिती
(१.३.२००७)