विडंबन

आमची प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांची कविता वाढदिवस

विडंबन
प्रथम
लिहीणाऱ्या कवीचा
आदर
नंतर
लिहीलेल्या कवितेची
खिल्ली

विडंबन
प्रथम
लिहीलेल्या शब्दांची
नोंद
नंतर
त्यांच शब्दांची
फेर मांडणी

विडंबन
प्रथम
मिळालेल्या अनुभवांची
आठवण
नंतर
घेतलेल्या अनुभवांची
टवाळी

केशवसुमार...