कच्ची कैरी-कांदा चटणी

  • एक कच्ची कैरी - मध्यम आकाराची
  • दोन कांदे - कैरीच्याच आकाराचे
  • अर्धा खोवलेला ओला नारळ किंवा एक वाटी सुके खोबरे
  • पांच ते सात सुक्या मिरच्या - मध्यम तिखट होण्यासाठी.
  • एक चहाचा चमचा जीरे, चवीनुसार मीठ व साखर.
१५ मिनिटे
दोघांना आठवडाभर पुरेल इतकी-

कैरी व कांदा साफ करून व मध्यम आकाराचे तुकडे करून कापून तयार ठेवावा. 

सुक्या मिरच्या; जीरे; मीठ व साखर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावेत.
वाटताना पाणी टाकू नये कोरडेच वाटून घ्यावे.
कच्ची कैरी व कांदा (कापलेला) एकत्र टाकून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा.
मग ओला नारळ / खोबरे टाकून फिरवून घ्यावे.

चटणी तयार... !

पाणी अजीबात टाकू नये. कैरी व कांद्याला वाटताना पाणी सुटेलच त्यावरच समाधान मानावे.

सर्व प्रकारच्या भात आणि बिर्याणी बरोबर रुचकर लागते.

कैरीचे आंबटवरण असेल तर झक्कासच.

सोबत मसाला पापड घेण्यास विसरू नये !

सुगरण कोण ? अर्थात आईच !