प्रीतिसंगम

संथ कृष्णा तव मनाची, मम मनाची कोयना
सांग राणी, प्रीतिसंगम आज होइल, होय ना? ।ध्रु।

लोटली शतके किती गे पटवण्यासाठी तुला
संयमी मजहून दिसला का जगी कोणी तुला?
भार वाढे जो उरी तो उतरण्याची सोय ना!
सांग राणी, प्रीतिसंगम आज होइल, होय ना? ।१।

दो नद्यांचा संगम जगी मानती जर पावन
का न व्हावा स्वर्ग जेथे दो मनांचे मीलन?
दर ऋतूला आस मज "हा प्रेमऋतु होतोय ना?"
सांग राणी, प्रीतिसंगम आज होइल, होय ना? ।२।

विनंती : हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे.