पाचर

आमची प्रेरणा - मधुकर

तुझ्या करांचा स्पर्श निबर अन जर्जर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा खरखर व्हावा ?

न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचा का ?
नशीब फुटके, तुझा जीवनी पाचर व्हावा !

कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुला कितीही वाटे की मी नोकर व्हावा

कशास रागे भरसी, आहे घाबरट मी तर
तुझ्या भीतिने शूरवीरही ताठर व्हावा

अशी जवळ ये जळणाऱ्यांचे पोट दुखावे
असा जवळ घे की सवतींना मत्सर व्हावा

टुकार झाल्या रचना येथे फार तरीही
प्रशासकांचा तरी न त्यांना आवर व्हावा ?!

तुझे नि माझे मीलन घडता चांदणरात्री
न खोडसाळाचा कैसा मग फ़ादर व्हावा ?