(पावले)

पावले
"निलाजरी, बदनाम करती पावले"
ठसे पाहुनी अपुले चिडती पावले!

"मलाच का नकली पैंजणे मिळाली?"
'छन छन' करीत कुठे कुढती पावले!

फलंदाजाना बघ नडती पावले
   धाव घेण्यास जी न हलती पावले!

पुन्हा पुन्हा का लक्ष्मणरेष ओढतो ?
मुंग्यांची इथे ना पडती पावले

परावलंबित्व काय असते वेगळे?
जोडे भिजले तशी भिजती पावले!

न राहिले चपलचरण सौदामिनी......
वाहून भार किती थकती पावले!

दहा प्रकार लिहिण्या होते मोकळे..
पण विडंबनाकडे  वळती पावले
- कारकून

माझी प्रेरणा मिलिंद फणसे ह्यांची गझल- पावले