गोड खाणे

आमची प्रेरणा चिन्नु यांची गोड गझल गोड गाणे

मला वेड लावी सखे गोड खाणे
खुळावून खातो सखे गोड खाणे

कसे त्या शिऱ्याला विस्मरून जावे
मंतरून जाई सखे गोड खाणे 

मला हालव्याची दिसे रोज वाटी
तरंगे मनाशी सखे गोड खाणे

जरी आज आले मला हे घशाशी
कसे सांग सोडू सखे गोड खाणे 

उदासीन झाले किनारे दिलाचे
मधूमेह लावी सखे गोड खाणे

जरी बंद लाडू, मला आज झाले 
सुरू रोज चोरी! सखे गोड खाणे ...

अता दात सुद्धा मला सांगती हे
तुझे "केशवा" रे पुरे गोड खाणे