===आमची प्रेरणा - सोनालीवहिनींना झालेला भास.
त्रास
गंधाळला वारा वाहे घरभरी
धुवाया घेतले मोजे तुझे
मायेची सावली माहेरी विसावा
इथे ना विसावा त्रास तुझा
सुवर्णा क्षितिजा गुणी लेकी माझ्या
वंशदिव्याची पण आस तुला
काटक्यांच्या मोळी घेउनी चालते
डोईवर माझ्या भार तुझा
तसबिरीपुढे विडी मी ठेवते
आहे स्मरणात ढास तुझी