ही हवा, हा नदीचा किनारा

ही हवा, हा नदीचा किनारा

ही हवा, हा नदीचा किनारा | चंद्र ताऱ्यांचा रंगीत इशारा ||
म्हणतसे अरे अजाण | जमले तर तू प्रेम कर ||
हा ऋतू मिळेल ना तुला पुन्हा || धृ ||

ही रात्र संपो मुळी ना | होवो पहाटही मुळी ना ||
तू ही उघड नयन आणि पहा | केसांना मी आहे विखुरले ||
अशीच चांदण्यातळी | माझी चाले होडी ||
तुझ्या बाहूंचा घेऊन सहारा || १ ||

प्रियकरा ये, ही रात संतोषवी | प्रिये ये, करू या दोन गोष्टी ||
असा भेटला आज साजण | दृष्टी तुझी आणि हे नेत्र माझे ||
माझे स्पंदन, हृदयी तव वसो | ओठ माझे, करो तुझीच गूजे ||
भीते का मग हे मन | फुलून ये, भेट अन् ||
काय आमचे करेल हा जमाना || २ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०२०४