अशी सदिच्छा करते दुनिया

अशी सदिच्छा करते दुनिया

अशी सदिच्छा करते दुनिया, खोटा पावे जोर |
मनास आपल्या पुसून ठेवा, कोण नसतो चोर || धृ ||
काय मी खोटे बोलतो? (मुळी ना!)
काय मी निंदा करतो? (मुळी ना!)
काय मी विष घोळतो? (मुळी ना! जी मुळी ना!! जी मुळी ना!!!)

एक-दुसर्‍याला मार-मारुनी, बनती लोक अमीर |
मी ह्या चोरी म्हणतो आहे, दुनिया म्हणत नशीब || १ ||
काय मी खोटे बोलतो? (मुळी ना!)
काय मी निंदा करतो? (मुळी ना!)
काय मी विष घोळतो? (मुळी ना! जी मुळी ना!! जी मुळी ना!!!)
हो जरा दूर व्हा! दाजीबा सांभाळा!!

पंडित ज्ञानी ध्यानी पाहिले, दयाधर्मपथदूत |
रामनाम जपताती, चरती गोशाळा संचित || २ ||
काय मी खोटे बोलतो? (मुळी ना!)
काय मी निंदा करतो? (मुळी ना!)
काय मी विष घोळतो? (मुळी ना! जी मुळी ना!! जी मुळी ना!!!)

सच्चे फाशी चढता दिसले, खोटा करतो चैन |
लोक म्हणती ह्या ईश्वरी लीला, मी म्हणतो अन्याय || ३ ||
काय मी खोटे बोलतो? (मुळी ना!)
काय मी निंदा करतो? (मुळी ना!)
काय मी विष घोळतो? (मुळी ना! जी मुळी ना!! जी मुळी ना!!!)

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०१११

हा एका पंजाबी (चित्रपट)गीताचा अनुवाद आहे! ओळखू येईलच.