मराठी विरुद्ध बिहारी

मराठी विरुध बिहारी हा जयप्रकाश पवार यांचा लोकसत्ता मधला लेख वाचला त्यात भरपूर त्रुटी आढळल्या. हा लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

http://loksatta.com/daily/20070408/lokkal.htm

त्यांना बिहार मध्ये जाण्याचा तेथील माणसांना भेटण्याचा योग आला.या भेटीत त्यांना

आढळलेल्या काही गोष्टी. यावर माझे काही प्रश्न

१.बिहाऱ्यांमधील या गुणांच दर्शन बिहारमध्येच का होत मुंबईत का होत नाही.राजसाहेब ठाकरेंच्या भाषणानंतर बिहारी लोकांनी ( मुंबईतल्याही ) जो गोंधळ घातला ते काय लिहायला नको. मुळात तो गोंधळ आणि विरोध कशासाठी होता तेच मला कळले नाही.

२.परप्रांतात गेल्यावर तिथे टिकून राहण्यासाठी सर्वांनाच कष्ट घ्यावे लागतात.त्यासाठी बिहारी माणसाचीच कष्टाळू आणि कामसू अशी ओळख का ?

३.पैसे न चुकता गावी पाठवायचे यासाठी सुधा बिहारीच का तो तर प्रत्येक परप्रांतीय करतो.

त्यांनी अनुभवलेल्या या आणि अशा अनेक गोष्टी बिहाऱ्यांबद्दल वाचण्यास मिळाल्या आणि आश्रर्य वाटलं.

या बिहारी लोकांची दादागिरी आणि अरेरावी मी स्वतः बघितली आहे. न्यूज चेनलवर दाखवला गेलेला बिहार यापेक्षा काही वेगळा असेल अस वाटत नाही.बिहारी माणसांनी मुंबईत येऊन जितके प्रश्न निर्माण केले आहेत तितके इतर परप्रांतीयांनी निर्माण केले नसतील. अनेक गुन्हात यांचीच नावे भरपूर दिसतील.

जयप्रकाश पवारांना ज्या गोष्टी बिहारच्या एकाच भेटीत दिसल्या त्या गोष्टी कुठेच वाचण्यास आणि बघण्यास मिळाल्या नाही याच आश्चर्य वाटत.

बिहारी माणसांबद्दल अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा. http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm