ऑगस्ट
१४
२००७
आमची प्रेरणा मानस यांची सुरेख गझल एक वेडी वेदनेची जात आहे.
गटारी रात....
रोज मी मद्यालयी का जात आहे?
आज साली पण गटारी रात आहे
रंग डोळ्यांचा कसा हा लाल माझ्या,
यात देशीचा जरासा हात आहे
घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
वाटते मज वेगळी ही बात आहे!
काय मी आता करू या बायकोचे
झोपताना लाटणे हातात आहे!
"केशवा"ला काल इतके चोपलेकी
एक ना तोंडात त्याच्या दात आहे!
-केशवसुमार
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हा हा
प्रे. मिलिंद फणसे (बुध., १५/०८/२००७ - ०१:५८).
हेच
प्रे. चित्त (गुरु., १६/०८/२००७ - ०७:१७).
घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
प्रे. मानस६ (बुध., १५/०८/२००७ - ०३:२१).
मस्त
प्रे. आजानुकर्ण (बुध., १५/०८/२००७ - ०३:४८).
मस्त !!!
प्रे. बकुळ (बुध., १५/०८/२००७ - ०५:०३).
झकास!
प्रे. सर्वसाक्षी (बुध., १५/०८/२००७ - ०९:५४).
वा, वा ... अजून एक शेर
प्रे. संतोष कुलकर्णी (गुरु., १६/०८/२००७ - ०७:३५).
हा.. हा...
प्रे. श्रावण मोडक (शुक्र., १७/०८/२००७ - ०९:१०).
