ऑगस्ट १७ २००७

(...मित्रा)

तुझी कशी रे तुमान मित्रा...!  
बघून सारे गुमान मित्रा...!


खरेच का भूत आणि तीही
दिसायचे रे समान मित्रा


तसे तिचे पाहताच मजला,
डगमगलेले इमान मित्रा...?


मुलाहिजा ठेव तू जनाचा...
...जरा अता घे दमान मित्रा..


किती रिचवलेस सांग पेले...
...तुझे उडाले विमान मित्रा...!


पडो किडे "केशवा" स मेल्या ..
..करा अपेक्षा किमान मित्रा...

- ई.केशवसुमार, मॅक्लसफिल्ड


या विडंबनाची प्रेरणा    'सुरेशभट.इन' वर

Post to Feed

झकास..
छान !
...तुझे उडाले विमान मित्रा...!:):):)
इंद्रधनुष्य

Typing help hide