ऑगस्ट २१ २००७

पार्श्व अमुचे..

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल  प्रश्न ऐसे..

बायकोने लाटणे जे फेकले
पार्श्व अमुचे त्यामुळे हे शेकले!

"तारखा ह्या सांग चुकल्या रे कशा?"
का कधी माझे सखे तू ऐकले?

हा जरा नाजूक होता मामला
आणि मी चुपचाप गुडघे टेकले

लाजणे पाहून हे, कळले मला
ओसरी वर झोपणे मी येकले

तू असे गातोस मेल्या "केशवा"
लोक म्हणती कोण गर्दभ रेकले!!

-------------------केशवसुमार६९

  यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
हा जरा नाजूक होता मामला
छान
शेकले!
मस्त!
झकास
सहमत
मस्त विडंबन !

Typing help hide