ही ठमा

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल पौर्णिमा

चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा
पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा

भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता
केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा!

का अशी मम नजर  खिळली तिच्या पाठीकडे
ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा?

बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली
(साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा)

राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही
लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!