मला कसा हा म्हणतो मेला....

आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता  हात तुझा हातात......

मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला
लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला

नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू
भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा??
आनंदाने जगण्यासाठी.... भरपुर दे मजला

विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या
संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला

कसे जमावे माझे आता माझ्या पत्नीशी?
माय तिची ही कटेल केव्हा...उत्तर दे मजला

किती पहावी वाट सखे तू सांग जरा मजला
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या' 
दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला

----केशवसुमार