सोड असले नाद सगळे ....

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला....

घालते डोळा मला ती
दाबते ओठास दाती 

काय रे येतोस का तू
सोबतीला सांग राती


पाहुनी घायाळ झालो
पण पुढे झाली न छाती

वेळ नुसता खर्च झाला
गवसले काही न हाती

सोड असले नाद सगळे 
"केशवा" होईल माती

--केशवसुमार
(माघ शु.१ शके १९२९,
८ फेब्रु. २००८)