(गणित)

गणित ही मृण्मयीताईंची अप्रतिम गझल वाचून आम्ही त्यांच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत घातले. त्यांच्यासारखं उत्तम लिहिणं आम्हाला कधी जमणार हे केवळ तो देवच जाणे. आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हाला जे करता आलं ते मात्र आम्ही केलं - मोडतोड!
विडंबनाचा हा 'मोडकातोड'का प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती
--अदिती

कधीचे तुझे नाव केले वजा
तुझे काव्य म्हणजे आम्हाला सजा

कधीचे अम्ही वाचणे सोडले
तरी थांबल्या ना तुझ्या 'बेरजा'

जणू काय हाराकिरी मूर्त तू
तुला पाहता आठवे शारजा

स्मृतींनी सुधा देह कंपून जातो
पुरे काव्य आता, जरा दे रजा

नवे नाव पाहून होते अवस्था-
तुझी नामशंका, घरे काळजा!

तुला वाटले की "लिहावे अता"
क्षणी त्या स्थळा सोडुनी दूर जा

--अदिती
(माघ वद्य १४शके १९२९,
६ मार्च २००८)