झोप आल्यावाचून लोळायचे

(अर्थात निष्काम कर्मयोग!)

दिवसा दो घास गिळायचे
झोप आल्यावाचून लोळायचे ।ध्रु।

पेपर रोज पहाणे
रेझ्यूमे धाडत जाणे
कोळसे तेच उगाळायचे ।१।

तोंडात अडते बोली
भीतीने चप्पल ओली
विचार करणे टाळायचे ।२।

थरारे काळीज फार
झेपेना कर्जाचा भार
हप्त्यांचे शेड्यूल पाळायचे ।३।

डिग्री जरी माझ्यापाशी
किंमत ना ये जराशी
कागद काय ते जाळायचे ।४।

(मंगेश पाडगावकरांची क्षमा मागून)

१ . झोप् आल्यावाचून ... असे वाचावे.

(बोस्टन २००२)