प्रस्तावना

प्रस्तावना


'सूर्य उगवलाच नाही तर' ह्या विषयावर आपण एकदा तरी निबंध लिहिला असेल. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना 'सूर्य उगवला नाही तर दिवस उजाडणार नाही, म्हणजे आई सकाळी लवकर उठवणार नाही, जास्त वेळ झोपता येईल आणि शाळेत जावे लागणार नाही' असा आनंद असतो. माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना शास्त्र विषयांमधून सूर्याच्या अस्तित्वावर पृथ्वीचे अस्तित्व कसे अवलंबून आहे आणि म्हणून असलेले सूर्याचे अनन्यसाधारण महत्व अशी माहिती मिळालेली असते. आजची सजीवांस जगण्यास योग्य असलेली परिस्थिती पृथ्वीवर निर्माण करण्यामधे चंद्राचाही वाटा असला तरी 'चंद्र नसता तर' असा निबंध मात्र कधी लिहायची वेळ शालेय जीवनात येत नाही. चंद्राचे वाङमयातील स्थान बरेचसे 'सुंदर-तरतरीत- गोर्‍या' चेहर्‍याच्या विशेषणापुरतेच मर्यादित राहिले आहे. चन्द्राच्या निर्मितीपासून (ज्या संदर्भात अनेक संकल्पना (thiories) अस्तित्वात आहेत) पृथ्वीच्या हवामानामधील दीर्घकालीन बदलांसाठी (सूर्याएवढा नसला तरी) चंद्रही जबाबदार आहे.


पृथ्वीचे भूतकालीन हवामान हे आताच्या स्वरूपामधे आणण्यामधे चंद्राचा असलेला सहभाग हा महत्वाचा आहे. ह्या विषयावर संशोधनही झालेले आहे. चंद्राला पृथ्वीचा उपग्रह संबोधले जात असले आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो अशी सर्वसाधारण कल्पना असली तरी प्रत्यक्षात चंद्र व पृथ्वी हे दोन्ही ग्रह चंद्र-पृथ्वी मिळून तयार होणार्‍या संयुक्त संस्थेच्या गुरुत्वमध्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जातो आहे. हा वेग अतिशय कमी असला तरी अनेक वर्षांनन्तर चंद्र - पृथ्वी हे अंतर आजच्या अंतरापेक्षा बरेच भिन्न असेल आणि त्याचे पृथ्वीय हवामानावर परिणाम झाल्यावचून रहाणार नाहीत. अर्थात तोपर्यंत पृथ्वीवर मानवी अस्तित्व राहिल्यास ह्या बदललेल्या हवामानाचा विचार करावा लागेल. 


पृथ्वीचा अक्ष सध्या तिच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रतलाशी साडेतेवीस अंशाचा कोन करत असला तरी हा कोन एक्केचाळीसहजार वर्षांमधे साडीकवीस ते साडेचोवीस ह्या कोनीय-अंतरामधे फिरतो. पूर्वी हा कोन जवळपास साठ अंश एवढा होता व कोनीय-अंतरही मोठे होती. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याने हा कोन कमी होत गेला तसेच कोनीय-अंतरही कमी झाले. पूर्वी हा कोन मोठा असताना त्यावेळचे हवामानही म्हणून वेगळे होते. भरती-ओहोटी चे महत्व सर्वांना माहित आहेच, ज्यासाठीही चंद्र कारणीभूत आहे.


तर पृथ्वीचे भूतकालीन हवामान आणि चंद्राचे (व सूर्याचे ही) महत्व ह्या पुढील भागांमधे लिहिण्याचा विचार आहे. वाचा....


क्रमश: