अनुदिन्यांच्या स्वरूपात (ब्लॉग) आंतरजालावर विविध प्रकारचे मराठी लेखन होत आहे. आपल्या वाचनात आलेल्या अशा लेखनाविषयी इतरांना माहिती देण्यासाठी हा चर्चाविषय सुरू केलेला आहे.
अशी माहिती येथे देताना
- तेथले संपूर्ण येथे लेखन उतरवू नये. त्याचा थोडक्यात गोषवारा किंवा त्याची चुणुक(टीझर) म्हणून त्यातला एखादा परिच्छेद किंवा कविता असल्यास एकदोन ओळी इतपतच मजकूर येथे प्रतिसादाच्या स्वरूपात लिहावा.
- त्याबरोबर मूळ लेखाचा आणि अनुदिनीचा असे दोन्ही दुवे देण्याचीही काळजी घ्यावी.
- प्रतिसादाला मूळ लेखाशी सुसंबद्ध असे अर्थपूर्ण शीर्षक द्यावे.